wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Concept of Mind

Total questions: 10

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

बुद्धीमापनाची भाषिक चाचणी म्हणजे ?

a)

ज्यात चित्रांचा व आकृत्यांचा उपयोग केला जातो अशा चाचण्या

b)

ज्यात चाचणीत काहीतरी कृती करायची असते अशी चाचणी.

c)

ज्या चाचण्या छापील असतात अशा चाचण्या

d)

ज्यात भाषेचा वापर/उपयोग केला जातो अशा चाचण्या.

2.

बुद्धीमापनाच्या सामुहिक चाचण्या या एकावेळी एकापेक्षा जास्त व्यक्तिंना देता येतात.

a)

चुक

b)

बरोबर

c)

वरीलपैकी दोन्ही नाही

3.

बुद्धीगुणांकाचे सुत्र काय आहे ?

a)

बुद्धीगुणांक = शारिरीक वय / मानसिक वय × १००

b)

बुद्धीगुणांक = शारिरीक वय / बौद्धिक वय × १००

c)

बुद्धीगुणांक = शारिरीक वय / अपेक्षित वय × १००

d)

बुद्धीगुणांक = मानसिक वय ⁄ शारिरीक वय × १००

4.

बुद्धीमापनाच्या वैयक्तिक चाचण्या एकावेळी एकाच व्यक्तीच्या बुद्धीचे मापन करतात व त्याचबरोबर एकाचवेळी अनेक व्यक्तिंच्या बुद्धीचे सुद्धा मापन करू शकतात.

a)

चूक

b)

बरोबर

c)

वरीलपैकी दोन्हीही

d)

वरीलपैकी दोन्हीही नाही

5.

खालीलपैकी कोणती क्षमता ही बुद्धी नाही/नसते.

a)

समस्या सोडविण्याची क्षमता.

b)

अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता

c)

विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट कार्य करण्याची

d)

नवीन गरजांशी समायोजन करण्याची/नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची

क्षमता.

6.

जर १० वर्षे वयोगटासाठी तयार केलेली बोधात्मक चाचणी ८ वर्षाच्या मुलाने सोडविली तर त्याचे मानसिक वय १० वर्षे असते. यावरून तूम्ही मानसिक वयाची व्याख्या कशी कराल.

a)

एखादी व्यक्ती जेव्हा विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली बुद्धीमापन चाचणी अचूकपणे सोडवू शकते, त्या वयाला त्या व्यक्तीचे मानसिक वय असे म्हणतात.

b)

एखादी व्यक्ती जेव्हा विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली कोणत्याही प्रकारची चाचणी अचूकपणे सोडवू शकते, त्या वयाला त्या व्यक्तीचे मानसिक वय असे म्हणतात.

c)

एखादी व्यक्ती जेव्हा विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली बुद्धीमापन चाचणी अचूकपणे सोडवू शकत नाही, त्या वयाला त्या व्यक्तीचे मानसिक वय असे म्हणतात.

d)

व्यक्तिची मानसिक क्षमता

7.

बुद्धीगुणांक = मानसिक वय / शारिरीक वय × १०० या बुद्धीगुणांकाच्या सुत्रानुसार बुद्धीगुणांक म्हणजे काय ?

a)

व्यक्तीचे मानसिक वय व शारिरीक वय यांची सरासरी.

b)

व्यक्तीच्या मानसिक वयाला शारिरीक वयाने भागुन येणाऱ्या उत्तराला १०० ने गुणले असता येणारा गुणांक होय.

c)

व्यक्तीचे शारिरीक वय व मानसिक वयांचा गुणाकार

d)

व्यक्तीच्या मानसिक वय व शारिरीक वय यांचे एकमेकांशी असणारे गुणोत्तर.

8.

रोहितला टायपिंग खुप वेगाने करता येते त्याचप्रमाणे तो अचुक टायपिंग करतो मात्र त्याला गणित करणे व हिशोब ठेवणे चांगल्याप्रकारे जमत नाही म्हणजेच रोहितची गतिविषयक अभिक्षमता चांगली आहे यावरून अभिक्षमतेची व्याख्या कोणत्या दोन प्रकारे करता येइल.

a)

विशिष्ट क्षेत्रात विशेष कार्य करण्याची क्षमता.

b)

कोणतेही काम अचुकतेने व वेगाने करण्याची क्षमता

c)

प्रशिक्षणाने काही विशेष ज्ञान, कौशल्य किंवा प्रतिक्रीया संपादित करण्याची व्यक्तीची मुलभूत क्षमता

d)

टायपिंग करण्याची क्षमता

9.

रणजित व प्रशांत दोघेही विज्ञान शाखेत आहे अभ्यासाच्या ताणामुळे त्या दोघांना ताण येतो व त्यांची चिडचिड होते मात्र रणजितला लवकरच हे कळाले की प्रशांतला विज्ञान आवडत नाही त्याने घरच्यांच्या ताणामुळे विज्ञान शाखा निवडली आहे. त्याने रणजितशी याबाबत बोलून त्याला कला शाखेतील राज्यशास्त्र, मानसशास्त्र व अर्थशास्त्र या विषयातील उत्तम करीअरची जाणीव करून दिली यावरून रणजितला भावनिक बुद्धीमत्ता आहे मग भावनिक बुद्धी म्हणजे काय हे शब्दांत कसे मांडता येइल.

a)

स्वत:च्या व इतरांच्या भावना ओळखण्याची व त्यात फरक करण्याची व या माहितीचा उपयोग एखाद्याच्या विचारांना व कृतीला मार्गदर्शन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धीमत्ता.

b)

इतरांच्या भावना समजून त्यांना मार्गदर्शन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धीमत्ता

c)

इतरांना योग्य वेळी आधार देण्याची व्यक्तिची मुलभूत क्षमता म्हणजे भावनिक बुद्धीमत्ता

d)

स्वत:च्या कमतरता व शक्ति ओळखण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धीमत्ता.

10.

विचलन बुद्धीगुणांक म्हणजे काय ?

a)

सरासरीपेक्षा जास्त बुद्धीगुणांक

b)

सरासरीपेक्षा कमी गुणांक

c)

प्रमाणित प्राप्तांकावर आधारित असलेला बुद्धीगुणांक

d)

प्रमाणित प्राप्तांकावर आधारित नसलेला बुद्धीगुणांक