NEW
Font size
S
M
L
XL
Worksheets5.3.4 निर्देश - ई) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडणे
Total questions: 30
Worksheet time: 15mins
Name
Class
Date
1.
रोहन हेमंतला सांगत होता, “............” येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
गेलो होतो फिरायला काल मी.
b)
फिरायला काल गेलो होतो मी.
c)
मी काल फिरायला गेलो होतो.
d)
मी गेलो होतो फिरायला काल.
2.
‘काबाडकष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दःख,दारिद्रय पाहन त्याचा ..............’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
जीव भांड्यात पडला
b)
जीव तुटत होता
c)
जीव घाबरा झाला होता
d)
जीव दडपून गेला
3.
‘राज्यातील मुलकी व्यवस्था शिवरायांनी ............’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
नीट नेटकी ठेवली होती.
b)
आकर्षक ठेवली होती.
c)
विस्कळीत ठेवली होती.
d)
चोख ठेवली होती.
4.
‘राहुलने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे गावातील मोठी दुर्घटना ............’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
वाचली
b)
टाळली
c)
टळली
d)
घडली
5.
‘जास्त जवळून टी. व्ही. पाहिल्याने डोळ्यांना ..........’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
त्रास बसतो
b)
आराम मिळतो
c)
त्रास होतो
d)
त्रास देतो
6.
‘रोशनी मला अभ्यासाला मदत ........... का?’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
देतेस
b)
करतेस
c)
घेतेस
d)
वाचतेस
7.
‘या वर्षीही पावसाने पाठ फिरवल्याने ........’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
झाला शेतकरी आनंदी
b)
श्रीमंती झाला शेतकरी.
c)
शेतकरी हवालदिल झाला.
d)
शेतकरी झाला सुखी.
8.
‘तानसेनांचे सुरेल गाणे ऐकण्यात दरबारातील सर्व लोक ............’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
तल्लीन झाले
b)
ओरडू लागले
c)
आनंदी झाले
d)
हसू लागले
9.
‘रामजीकाकांनी वर्गातील सर्व मुलांचे ..............’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
सत्कार केला
b)
कौतुक केले
c)
अभ्यास केला
d)
आभार केले
10.
‘राजूच्या दांडगटपणामुळे त्याच्या मित्रांनाही .........’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
स्वागत झाले
b)
बक्षीस मिळाले
c)
शिक्षा होती
d)
शिक्षा झाली
11.
‘सर्व सरदार आपापल्या ........... नुसार दरबारात उभे होते.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
रंगा
b)
उंची
c)
दर्जा
d)
वर्गा
12.
‘बाबा आमट्यांनी महारोग्यांची सेवा केली. त्यामुळे त्यांना लोकांचा ......... मिळाला.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
हवा
b)
आदर
c)
पैसा
d)
दुवा
13.
‘सर्वच वस्तूच्या वाढणाऱ्या किमती, हे सरकारला महागाई रोखण्यात आलेल्या अपयशाचेच .............. आहे.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
द्योतक
b)
पातक
c)
लक्ष
d)
जातक
14.
‘त्या किर्रऽऽ रानात रात्रीच्या वेळी एकटे जाण्यास कोणी ----- नसे.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
विचारात
b)
सावध
c)
धजावत
d)
धडपडत
15.
‘तो अट्टल चोर ........ खोटे बोलण्यात पटाईत होता.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
खूप
b)
धादांत
c)
भरपूर
d)
स्पष्ट
16.
‘कोवळ्या वयात जर योग्य मार्गदर्शन लाभले आणि यश मिळत गेले तर मुलांच्या कर्तबगारीला ........... फुटतात.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
कोंब
b)
अंकुर
c)
धुमारे
d)
फाटे
17.
‘'बिकट वाट वहिवाट नसावी ........... मार्गा सोडू नको.'’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
धोपट
b)
वाकड्या
c)
वाईट
d)
उंच
18.
‘हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा .......... टाकला.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
श्वास
b)
उच्छवास
c)
सुस्कारा
d)
नि:श्वास
19.
‘निढळाच्या ........ पैसा उधळताना मनाला त्रास होतो.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
घामाचा
b)
कर्माचा
c)
रक्ताचा
d)
मेहनतीचा
20.
‘.......... आनंद मिळवण्यासाठी मनही तसेच निर्मळ असावे लागते.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
स्वच्छ
b)
मोठा
c)
निरामय
d)
शांत
21.
‘उलटसुलट शंका-कुशंका उपस्थित करून विषयाला .....फोडण्याची त्याची ही जुनीच सवय आहे.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
काटे
b)
लाकडे
c)
फाटे
d)
वाटे
22.
‘परमेश्वराची कृपा म्हणून मी त्या संकटातून थोडक्यात .............’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
सुटलो
b)
निघालो
c)
सटकलो
d)
बचावलो
23.
‘वसंत ऋतूत फळा-फुलांचा ........... असतो.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
थाट
b)
बहर
c)
कहर
d)
तजेला
24.
‘चंद्राच्या मंद प्रकाशात समुद्रकिनाऱ्यावर बसून समुद्राची ............ ऐकणे हा विलक्षण अनुभव असतो.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
गाज
b)
बाज
c)
गाणी
d)
सळसळ
25.
‘आजूबाजूच्या अनेक गावांमधील, वाड्यांमधील ............. मल्ल जत्रेतील कुस्तीच्या सामन्यात सहभागी होतात.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
बहरलेले
b)
बरबटलेले
c)
कसलेले
d)
भरलेले
26.
‘आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, म्हणून आम्ही .......... महोत्सव साजरा केला.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
हीरक
b)
सुवर्ण
c)
अमृत
d)
रजत
27.
‘संकट आले, तर ...........’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
पळून जावे
b)
दु:ख करीत बसावे
c)
डगमगू नये
d)
आनंदी राहावे
28.
‘बाळाला झोपवताना आईने त्यास .............’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
मारले
b)
धोपटले
c)
उठवले
d)
थोपटले
29.
‘उतरणीवरून वाहणारे पाणी फार ..........’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
आवाज करते
b)
संथ वाहते
c)
पसरते
d)
आवाज करीत नाही
30.
‘वादविवाद स्पर्धेत रामाने गोविंदावर ........... केली.’ येथे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.
a)
कंडी
b)
रडी
c)
वडी
d)
कडी
Reset
