Worksheetsप्रवासवर्णन
Total questions: 15
Worksheet time: 16mins
मराठीत खऱ्या अर्थाने 'प्रवासवर्णन' या वाड्मय प्रकाराला सुरुवात झाली तेव्हा त्यामागे भाषांतराची प्रेरणा होती. त्यामुळे मराठीतील सुरुवातीची प्रवासवर्णने ही भाषांतरीत स्वरूपाची होती.
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक
_________ यांचे 'काशीप्रवास' हे स्वतंत्र रीतीने लिहिलेले मराठीतील पहिले प्रवासवर्णन होय.
श्यामराव मोराजी
पु. ल. देशपांडे
गंगाधर गाडगीळ
ज्या काळात प्रवास करणे पाप मानले जायचे त्या काळात पंडिता रमाबाईंनी इंग्लंडचा प्रवास केला पण त्यांनी एकही प्रवासवर्णन लिहिले नाही.
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक
प्रवास करताना प्रवासवर्णनकार त्या प्रदेशातील आचार विचार, बऱ्या वाईट समजुती इष्ट अनिष्ट, श्लील अश्लीलासंबंधीच्या समजुती हे सर्व प्रत्यक्ष अनुभवत असतो आणि त्यामुळे त्याने लिहिलेल्या प्रवासवर्णनामध्ये केवळ त्या प्रदेशाचे वर्णनच नव्हे तर त्याचे व्यक्तिमत्वही कळत नकळतपणे तो स्पष्ट करत असतो.
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक
'प्रवासवर्णन ही एक कवितेसारखीच स्वतंत्र निर्मिती आहे' अशी कवितेची व्याख्या कोणी केलेली आहे?
श्यामराव मोराजी
गंगाधर गाडगीळ
पु. ल. देशपांडे
प्राचीन काळात प्रवासाविषयक असलेल्या गैरसमजुतीमुळे प्रवास फारसे घडत नव्हते असे नाही. पण अर्वाचीन काळात मात्र प्रावसविषयक भूमिका बदलून ती अधिक व्यापक व वस्तुनिष्ठ होत गेली.
पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक
श्री. नाना नारायण यांचे 'इंग्लंड देशाचे वर्णन' किंवा श्री. करसनदास मुळजी यांचे 'इंग्लंडातील प्रवास' या प्रवासवर्णनांमागे कोणती प्रेरणा होती?
ज्ञानदानाची व ज्ञानग्रहणाची
सौंदर्यगानाची
भाषांतराची
पंडिता रमाबाई, केळकर, काका कालेकर, लोकमान्य टिळक यांच्या प्रवासवर्णनांमागे कोणती प्रेरणा असल्याचे दिसून येते?
सौंदर्यगानाची
राष्ट्रवादाची
भाषांतराची
पाश्चात्यांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर स्वतः ला इथे सुखकारकरित्या राज्य करता यावे या कारणाने लोहमार्ग, जलमार्ग, जहाजे, आगगाड्या यासारख्या अनेक नव्या सोयी आणल्या. पण या सगळ्या सोयीमुळे प्रवास सुलभ व सुखकारक झाला व प्रवासाला आणि पर्यायाने प्रवासवर्णनाला चालना मिळाली.
पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक
खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय प्रवासवर्णनामागाची प्रेरणा म्हणून स्वीकारता येत नाही?
आत्माविष्कार
सौंदर्यगान
स्वाभिमान
प्रवासादरम्यानचा प्रसंग, घटना, अनुभव मांडत असताना लेखक त्याच्या नकळत स्वतः च्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर उलगडत असतो. पण त्यावरून त्याच्या व्यक्तिगत आवडी निवडी, गुण दोष, आचार विचार, त्याच्या सवयी याचे दर्शन मात्र वाचकांना अजिबात होत नाही.
पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर
पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक
खालील विधनांपैकी कोणते विधान योग्य आहे ते ओळखा.
प्रवासवर्णनांमध्ये कल्पनेपेक्षा वास्तव रेखटण्यावर जास्त भर द्यावा.
प्रवावावर्णनामध्ये वास्तवापेक्षा काल्पनिक विश्व रेखटण्यावर जास्त भर द्यावा.
प्रवावावर्णनामध्ये वास्तव आणि कल्पना या दोन्हींना अजिबात स्थान देऊ नये.
खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.
प्रवासवर्णनामध्ये प्रवासवर्णनकाराने सुंदर बाजूला स्थान दिले नाही तरी चालते पण कुरूप बाजूचा मात्र समावेश करणे आवश्यक असते.
प्रवासवर्णनामध्ये प्रवासवर्णनकाराने सुंदर आणि कुरूप दोन्ही बाजूंना समान स्थान देणे आवश्यक असते.
प्रवासवर्णनामध्ये प्रवासवर्णनकाराने कुरूप बाजूचा अजिबात समावेश करू नये कारण त्यामुळे त्याच्या प्रवासवर्णनाचे सौंदर्य कमी होण्याचा धोका असतो.
खाली दिलेल्या प्रवासवर्णनांचा कालिकदृष्ट्या योग्य क्रम कोणता?
'काशीप्रवास', 'काशीयात्रा', 'माझा प्रवास'
'माझा प्रवास', 'काशीप्रवास', 'काशीयात्रा'
' काशीयात्रा', 'माझा प्रवास', 'काशीप्रवास'
खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
इंग्लंडचा प्रवास : पंडिता रमाबाई
गोकर्ण महाबळेश्वराचे यात्रेप्रकरणी वृत्तांत : गोविंद जोशी
माझा प्रवास : न. चिं. केळकर
