NEW
Font size
Worksheetsसत्पथ प्रश्नमंच प्रतियोगिता
Total questions: 20
Worksheet time: 10mins
1. अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी इच्छित वस्तू ओळखण्यासाठी अथवा वेगळी करण्यासाठी वस्तू चे जे चिन्ह अथवा गुणधर्म उपयोगी पडते त्याला .......... म्हणतात.
A. धर्म
B. खूण
C. लक्षण
D. चेतना
2. ज्यामध्ये स्व आणि पराचा अवभास होतो त्यास ......... म्हणतात.
A. धर्म
B. खूण
C. लक्षण
D. चेतना
3. पराच्या निमित्ताने ( अवलंबनाने ) जाणणाऱ्या ज्ञानास .......... ज्ञान म्हणतात.
A. परोक्ष
B. प्रत्यक्ष
C. सम्यक्
D. मिथ्या
4. ज्ञानोपयोगाचे एकूण किती प्रकार आहेत ?
A. 4
B. 8
C. 6
D. 10
5. एकेंद्रिय जीवाचे अनंत दुःख आणि सिद्धांचे अनंत सुख कोण जाणतात ?
A . एकेंद्रिय जीव
B . केवलज्ञानी भगवान
C. आपण सर्व
D. अजीव
6. अस्पष्ट - अविशद प्रतिभास असणारे ज्ञान .......... ज्ञान होय.
A. प्रत्यक्ष
B. परोक्ष
C. सम्यक
D. मिथ्या
7. विश्वातील सर्व पदार्थांना एकाच वेळी प्रत्यक्ष जाणारे ज्ञान कोणते ?
A. अवधिज्ञान
B. मनःपर्ययज्ञान
C. सम्यक् ज्ञान
D. केवलज्ञान
8. खालीलपैकी परोक्ष ज्ञाने कोणती ?
A. मति श्रुत
B. अवधि मनःपर्यय
C. केवलज्ञान
D. माहित नाही
9. मनःपर्यय ज्ञान कोणाला होते ?
A. कोणालाही
B. भगवंतांना
C. काही मुनिराजांना
D. सर्वच मुनिराजांना
10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
A. मूर्तिक इंद्रिये अमूर्तिक पदार्थाला जाणतात.
B. मूर्तिक इंद्रिये मूर्तिक पदार्थाला जाणतात.
C. अमूर्तिक आत्मा मूर्तिक पदार्थाला जाणतो.
D. माहित नाही
11. मतिज्ञानाच्या आधारे होणारे पुढील ज्ञान कोणते ?
A. केवलज्ञान
B. मनःपर्यय
C. अवधिज्ञान
D. श्रुतज्ञान
12. परोक्ष असून देखील मतिश्रुत ज्ञानाना न्यायशास्त्रात काय म्हटले आहे ?
A. अविशद परोक्ष
B. विशद प्रत्यक्ष
C. सांव्यावहारिक प्रत्यक्ष
D. निर्मल प्रत्यक्ष
13. पराच्या निमित्ताशिवाय ( अवलंबनाशिवाय ) जाणणाऱ्या ज्ञानास ........ ज्ञान म्हणतात.
A. प्रत्यक्ष
B. परोक्ष
C. सम्यक्
D. मिथ्या
14. अनेकांतात्मक वस्तूस्वरूपाच्या कथनाला ........... म्हणतात.
A. वाद
B. स्याद्वाद
C. नय
D. संवाद
15. आपल्या विशिष्ट ज्ञानाद्वारे मुनी संघामध्ये अध्ययन - अध्यापन करणाऱ्या महाराजांना ............ म्हणतात.
A. अरिहंत
B. आचार्य
C. उपाध्याय
D. साधू
16. खालीलपैकी कोणास अवधिज्ञान नसते ?
A. देव
B. चक्रवर्ती
C. सिद्ध भगवान
D. नारकी
17. आपल्या दुःखास खऱ्या अर्थाने कोण कारणीभूत आहे ?
A. आख्खं जग
B. शत्रू
C. आपण स्वतः
D. पूर्वीचे कर्म
18. स्पष्ट - निर्मल प्रतिभास असणारे ज्ञान ............ ज्ञान होय.
A. प्रत्यक्ष
B. परोक्ष
C. सम्यक्
D. मिथ्या
19. वस्तूच्या विविधांगी जटिल स्वरूपाचे नाव ........... आहे.
A. अपरिग्रह
B. अहिंसा
C. अनेकांत
D. आस्तिकत्व
20. मतिश्रुत ज्ञानी साधक जीवाचे आत्मसाक्षात्कार वेळचे ज्ञान ............... म्हणून ओळखले जाते.
A. विशद
B. अविशद
C. सांव्यावहारिक प्रत्यक्ष
D. स्वानुभव प्रत्यक्ष
