Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

शिवस्फुर्ती प्रश्नमंजुषा गट:२

Total questions: 50

Worksheet time: 50mins

Name
Class
Date
1.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा `तिसरा डोळा' म्हणून कोणास ओळखले जाते?

a)

शिवा काशिद

b)

सुर्याजी मालुसरे

c)

बहिर्जी नाईक

d)

कोंडाजी फर्जंद

2.

गडकोटांचे व्यवस्थापन खालील पैकी कोणते अधिकारी करत असत?

a)

किल्लेदार

b)

सबनीस

c)

कारखानीस

d)

वरील सर्व

3.

शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी खालील पैकी कोणत्या नदीचे पाणी नव्हते?

a)

गंगा

b)

यमुना

c)

तापी

d)

कावेरी

4.

शिवाजी महाराजांनी खालील पैकी कोणत्या तज्ञाकरवी अनेक नवीन किल्ले बांधले?

a)

बहिर्जी नाईक

b)

फिरंगोजी नरसाळा

c)

अर्जोजी यादव

d)

तानाजी मालुसरे

5.

रामचंद्र अमात्य यांनी लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात गडकोटांचे महत्त्व सांगितले आहे?

a)

तुकाराम गाथा

b)

शेतकऱ्यांचा आसूड

c)

आज्ञापत्र

d)

शिवछत्रपती

6.

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इंग्रजांचा कोणता प्रतिनिधी उपस्थित होता?

a)

कृष्णाजी भास्कर

b)

लार्ड माऊंटबॅटन

c)

गॅलिलिओ

d)

हेन्री ऑक्सएडन्स

7.

पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी संघर्ष करण्यासाठी शिवाजी महाराजांनी------उभारणीकडे लक्ष दिले.

a)

घोडदळ

b)

पायदळ

c)

आरमार

d)

किल्ले

8.

आग्रा येथून सुटका करून घेतांना शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना -----येथे ठेवले.

a)

मथुरा

b)

गोवळकोंडा

c)

दिल्ली

d)

सुरत

9.

शिवराज्याभिषेक पौरोहित्य करण्यासाठी गागाभट्ट यांना कोठून आणले होते?

a)

मथुरा

b)

पैठण

c)

रामेश्वर

d)

काशी

10.

सन १६३३ मध्ये शिवरायांनी रामदास स्वामी यांना परळी किल्ल्यावर राहण्याची विनंती केली कालांतराने परळी किल्ल्याचे नामांतर -------करण्यात आले.

a)

समर्थ गड

b)

पुरंदर

c)

वैजनाथ गड

d)

सज्जन गड

11.

सातारा हे शहर -------किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.

a)

सिंहगड

b)

पन्हाळगड

c)

अजिंक्यतारा

d)

विजयदुर्ग

12.

शिवाजी महाराजांनी दुरुस्ती केलेले दोन जलदुर्ग खालील पैकी कोणते?

a)

सिंधुदुर्ग व जंजिरा

b)

पन्हाळगड व सिंहगड

c)

सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग

d)

रायगड व प्रतापगड

13.

शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा किल्ला खालील पैकी कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?

a)

भुईकोट किल्ला

b)

जलदुर्ग

14.

खालील पैकी कोणता किल्ला जलदुर्ग नाही?

a)

विजयदुर्ग

b)

पुरंदर

c)

जंजिरा

d)

सिंधुदुर्ग

15.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील'छावा'या कादंबरीचे लेखक कोण?

a)

विश्वास पाटील

b)

रणजीत देसाई

c)

कृष्णाजी केळकर

d)

शिवाजी सावंत

16.

तानाजी मालुसरे हे कोकणातील कोणत्या गावचे राहणारे होते?

a)

महाड

b)

चिपळूण

c)

उमरठे

d)

रत्नागिरी

17.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई (राजसबाई) खालील पैकी कोणाच्या कन्या होत?

a)

लखुजी जाधव

b)

पिलाजी शिर्के

c)

चंद्रराव मोरे

d)

हंबीरराव मोहिते

18.

छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?

a)

कन्हेरगड

b)

जिंजी

c)

विशाळगड

d)

मुरूड

19.

खालील पैकी चुकीची पर्याय कोणता?

a)

फलटण-निंबाळकर

b)

सावंतवाडी-सावंत

c)

सिंदखेडराजा-जाधव

d)

जावळी-मोहिते

20.

तान्हाजी-द अनसंग वारिर्यर या हिंदी चित्रपटातील शिवाजी महाराज यांची भुमिका साकारणारे वरील चित्रातील अभिनेते कोण?

a)

महेश मांजरेकर

b)

अमोल कोल्हे

c)

शरद केळकर

d)

शरद पोंक्षे

21.

दक्षिणेतील तंजावर ची जहागिरी सांभाळणारे शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ खालील पैकी कोण?

a)

विठोजी

b)

मालोजीराव

c)

व्यंकोजी

d)

शरीफजी

22.

कुतुबशाहची राजधानी खालील पैकी कोणती होती?

a)

म्हैसूर

b)

गोवळकोंडा

c)

आदिलाबाद

d)

सुरत

23.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यशासन किती वर्ष चालविले?

a)

पाच

b)

सहा

c)

दहा

d)

सोळा

24.

प्रतापगडावरील भेटीदरम्यान उपस्थित अफजलखानाचा वकील खालील पैकी कोण?

a)

शाहिस्तेखान

b)

कृष्णाजी भास्कर

c)

सय्यद बंडा

d)

मिर्झा राजे जयसिंग

25.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानंतर-------या घोड्यावर बसले होते.

a)

कृष्णा

b)

तुरंगी

c)

मोती

d)

विश्वास

26.

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ येथे खालील पैकी कोणाची समाधी आहे?

a)

शरीफजी राजे भोसले

b)

शहाजी राजे भोसले

c)

राजाराम राजे भोसले

d)

मालोजीराजे भोसले

27.

शिवराय बादशहा च्या कितव्या वाढदिवसानिमित्त आग्रा येथे भेटीसाठी गेले होते?

a)

५० वा

b)

६१ वा

c)

६५ वा

d)

७१ वा

28.

शिवकाळात तोफा गंजू नयेत म्हणून कशाचा वापर केला जात?

a)

शिसे

b)

मेण

c)

कथिल

d)

चांदी

29.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील श्रीमानयोगी या कादंबरीचे लेखक कोण?

a)

विश्वास पाटील

b)

शिवाजी सावंत

c)

कृष्णाजी केळकर

d)

रणजीत देसाई

30.

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची समाधी खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे?

a)

सिंदखेडराजा

b)

शिवनेरी

c)

वेरूळ

d)

पाचाड

31.

खालील पैकी कोण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या नाहीत?

a)

अंबिका बाई

b)

भवानी बाई

c)

राजकुंवर बाई

d)

राणूबाई

32.

छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेले वढू बुद्रुक हे ठिकाण खालील पैकी कोणत्या नदीच्या त्रिवेणी संगमावर वसलेले नाही?

a)

इंद्रायणी

b)

कृष्णा

c)

भामा

d)

भिमा

33.

औरंगजेब ने छत्रपती संभाजी महाराज यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कैदैत ठेवले होते?

a)

तुळापुर

b)

बहादूरगड

c)

सुरत

d)

श्रृंगारपूर

34.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला?

a)

पुराणिक शक

b)

इ.स.पुर्व शक

c)

राज्याभिषेक शक

d)

शालिवाहन शक

35.

महाराणी ताराबाई ह्या खालील पैकी कोणाच्या कन्या होत?

a)

लखोजी जाधव

b)

पिलाजी शिर्के

c)

हंबीरराव मोहिते

d)

चंद्रराव मोरे

36.

रायगडावरील शिवरायांची समाधी खालील पैकी कोणी शोधुन काढली?

a)

गोपाळ गणेश आगरकर

b)

विष्णूशास्त्री चिपळूणकर

c)

महात्मा ज्योतिबा फुले

d)

लोकमान्य टिळक

37.

चित्रातील शिवकालीन मर्दानी खेळ कोणता?

a)

मल्लखांब

b)

भालाफेक

c)

दांडपट्टा

d)

तलवारबाजी

38.

चित्रातील शिवकालीन शस्त्र कोणते?

a)

खंडा

b)

कट्यार

c)

कुकरी

d)

समशेर

39.

राजा शिवछत्रपती या ग्रंथांचे लेखक असलेले वरील चित्रातील शिवशाहीर कोण?

a)

शाहीर अमर साबळे

b)

शाहीर बाबासाहेब पुरंदरे

c)

शाहीर कल्याण काळे

d)

शाहीर बाबासाहेब देशमुख

40.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती?

a)

टाक

b)

रूपया

c)

होण

d)

शिवराई

41.

वरील चित्रातील राजमुद्रा ही कोणत्या राजांची आहे?

a)

छत्रपती शिवाजी महाराज

b)

छत्रपती शहाजीराजे

c)

छत्रपती संभाजी महाराज

d)

छत्रपती राजाराम महाराज

42.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाने पावन झालेली खिंड कोणती?

a)

कोल्हे खिंड

b)

कार्ले खिंड

c)

घोड खिंड

d)

वाघोबा खिंड

43.

शिवरायांकडे पुणे,सुपे, चाकण व ------ या परगण्यांची जहागीर होती?

a)

इंदापूर

b)

तंजावर

c)

जावळी

d)

फलटण

44.

चित्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोण?

a)

छत्रपती संभाजीराजे भोसले

b)

छत्रपती अभयसिंहराजे भोसले

c)

छत्रपती उदयनराजे भोसले

d)

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे

45.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक साठीचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होत?

a)

३४ मण

b)

३२ मण

c)

४३ मण

d)

२१ मण

46.

१६७३ साली अवघ्या ६० मावळ्यांच्या मदतीने कोंडाजी फर्जंद यांनी कोणता किल्ला ताब्यात घेतला?

a)

अजिंक्यतारा

b)

पुरंदर

c)

सिंहगड

d)

पन्हाळगड

47.

निश्र्चयाचा महामेरू , अखंड स्थितीचा निर्धारु! बहुत जनांसी आधारु,श्रीमंतयोगी! शिवरायांचे असे वर्णन कोणी केले आहे?

a)

संत तुकाराम महाराज

b)

समर्थ रामदास स्वामी

c)

संत एकनाथ महाराज

d)

संत नामदेव महाराज

48.

खालील पैकी कोणते महानाट्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे?

a)

छावा

b)

स्वराज्यरक्षक

c)

जाणता राजा

d)

धर्मवीर

49.

छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला?

a)

स्वराज्य

b)

समनयन

c)

बुधभूषण

d)

स्वराज्य प्रेरणा

50.

खालील पैकी चुकीची जोडी कोणती?

a)

शहाजीराजे-स्वराज्यसंकल्पक

b)

जिजाऊ -स्वराज्यप्रेरीका

c)

शिवाजी महाराज- हिंदवी स्वराज्य संस्थापक

d)

यापैकी नाही