wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

क्षमताधारित प्रश्नावली १ (प्र. १ ते २५)

Total questions: 25

Worksheet time: 25mins

Name
Class
Date
1.

1) एक कार विराम अवस्थेतून निघून 2.5 मीटर प्रति सेकंद2 या एकसमान त्वरणाने 30 सेकंदापर्यंत रस्त्यावर धावते तर कारचा अंतिम वेग आणि कारने कापलेले अंतर किती ?

a)

45 मीटर/सेकंद आणि 1125 मीटर

b)

45 मीटर/सेकंद आणि 2250 मीटर

c)

75 मीटर/सेकंद आणि 1125 मीटर

d)

75 मीटर/ सेकंद आणि 2250 मीटर

2.

2) राहुल रेल्वे स्थानकावर गेला असता त्याने काही निरीक्षणाच्या आधारावर आलेख तयार केला. सोबतच्या आलेखाचा अभ्यास करून राहुलच्या निरीक्षणासाठी योग्य पर्याय सुचवा.

a)

गाडी A - धन त्वरण.

b)

गाडी B - ऋण त्वरण

c)

गाडी A - ऋण त्वरण
आणि
गाडी B - धन त्वरण

d)

गाडी A - धन त्वरण
आणि

गाडी B - ऋण त्वरण

3.

3) वस्तुमान (m) असलेली कार स्थिर गतीने (v), आकृतीत दाखविलेल्या मार्गावर फिरत आहे. तर कारच्या हालचालीदरम्यान कोणती भौतिक राशी स्थिर राहील?

a)

वेग

b)

संवेग

c)

गतिज ऊर्जा

d)

त्वरण

4.

4) एक सायकलस्वार 4.4 मीटर/सेकंद या वेगाने वर्तुळाकार ट्रॅक भोवती फिरतो. हा सायकलस्वार 300 सेकंदात 5 फेऱ्या पूर्ण करतो. तर वर्तुळाकार ट्रॅकची त्रिज्या किती असेल ?

a)

210 मीटर

b)

180 मीटर

c)

140 मीटर

d)

240 मीटर

5.

5) आलेखाच्या निरीक्षण करून वस्तूच्या गतीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्‍य आहे ते ठरवा.

a)

ती वस्तू नैकसमान गतीमध्ये गतिमान असेल.

b)

ती वस्तू एकसमान गतीमध्ये गतिमान असेल.

c)

ती वस्तू स्थिर असेल.

d)

ती वस्तू एकसमान त्वरणीत गतीमध्ये गतिमान असेल.

6.

6) विद्यार्थी पटांगणावर खेळत असताना, समीर उत्तरेकडे 4 किलोमीटर चालत जातो, नंतर उजवीकडे वळण घेतो आणि 3 किलोमीटर चालत जातो. तर त्याचे मूळ स्थानापासून किती विस्थापन होईल?

a)

5 किलोमीटर पूर्वेकडे

b)

7 किलोमीटर पश्चिमेकडे

c)

12 किलोमीटर पूर्वेकडे

d)

12 किलोमीटर पश्चिमेकडे

7.

7) शालेय सहलीसाठी विद्यार्थी रेल्वे स्थानकावर एकत्र आले असता विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ‘150 मीटर लांबीची ट्रेन 350 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म 50 सेकंदात पार करते.’ तर ट्रेनचा वेग किती असेल?

a)

7 मीटर/सेकंद

b)

10 मीटर/सेकंद

c)

3 मीटर/सेकंद

d)

8 मीटर/सेकंद

8.

8) सचिन मोटरसायकलने 4 तास प्रवास करतो. सचिनने मोटरसायकलच्या स्पिडोमीटरमध्ये प्रवासाच्या सुरुवातीला 10 किलोमीटर आणि प्रवासाच्या शेवटी 370 किलोमीटर अशी नोंद घेतली, तर मोटरसायकलचा सरासरी वेग मीटर/सेकंद मध्ये किती असेल?

a)

26 मीटर/सेकंद

b)

27 मीटर/सेकंद

c)

30 मीटर/सेकंद

d)

25 मीटर/सेकंद

9.

9) गाडी चालविताना सीट बेल्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून एखादी व्यक्ती गाडीत अचानक ब्रेक लावल्यास  समोरच्या बाजूस धडकणार नाही आणि अपघात होणार नाही. ब्रेक लावल्यानंतर पुढे झुकण्याची ही घटना न्यूटनच्या कोणत्या नियमांशी संबंधित आहे?

a)
  1. गतिविषयक पहिला नियम 

b)

गतिविषयक दुसरा नियम 

c)

गतिविषयक तिसरा नियम 

d)

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम

10.

10) सोबत दिलेल्या कारमधील गती दर्शक यंत्राचे निरीक्षण करा. यामध्ये खालीलपैकी कोणती भौतिक राशी दर्शवलेली असते?

a)

चाल

b)

वेग

c)

वेळ

d)

विस्थापन

11.

11) खालीलपैकी कोणते विधान संवेगाशी संबंधित नाही ?

a)

संवेगाला परिणाम व दिशा दोन्हीही असते.

b)

SI पद्धतीनुसार संवेगाची एकक किलोग्रॅम मीटर/सेकंद

c)

संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते.

d)

वस्तूच्या संवेगात बदल घडवून आणणाऱ्या आवश्यक बलावर संवेग बदलाचा दर अवलंबून नसतो.

12.

12) शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये धावण्याच्या अंतिम फेरीसाठी 4 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सोबतच्या आलेखात या स्पर्धेची माहिती संकलित केली गेली. तर शेजारील आलेखाचे निरीक्षण करून या स्पर्धेतील सर्वात वेगवान धावपटू कोण ते ओळखा? 

a)

रवी

b)

आनंद

c)

सचिन

d)

तुषार

13.

13) सागर मेट्रो ट्रेनने प्रवास करत होता. तर सारंग त्याच्या गाडीने त्याच ठिकाणी जात होता. परंतु सागर ठरलेल्या ठिकाणी सारंगच्या खूप आधी पोहोचला. सारंग आश्चर्यचकित झाला. या प्रसंगावर आधारित खाली दिलेल्या पर्यायांपैकी तुम्ही कोणत्या पर्यायाचे समर्थन कराल?

  1. 1) मेट्रो ट्रेन ट्रॅफिक जॅमपासून मुक्त आहे. 

  2. 2) सारंगची गती एकसारखी नव्हती. 

  3. 3) सागरने सार्वजनिक वाहतूक वापरून इंधनाची बचत केली.

a)

पर्याय – 1

b)

पर्याय - 2

c)

पर्याय - 3

d)

सर्व पर्याय योग्य आहेत. 

14.

14) एखादी वस्तू पहिल्या 10 सेकंदासाठी 5 मीटर /सेकंद या वेगाने आणि नंतर 20 सेकंदासाठी 10 मीटर/सेकंद या वेगाने प्रवास करते. तर त्या वस्तूचा सरासरी वेग किती?

a)

33.8 मीटर/सेकंद

b)

3.38 मीटर/सेकंद

c)

8.33 मीटर/सेकंद

d)

83.3 मीटर/सेकंद

15.

15) एक चेंडू वरच्या दिशेने फेकला जातो आणि नंतर तो चेंडू खाली येतो. तर त्याच्या त्वरणाची दिशा कोणती असेल?

a)

वरच्या दिशेने

b)

खालच्या दिशेने

c)

क्षितिज समांतर दिशेने

d)

क्षितिज लंब दिशेने विशिष्‍ट कोनातून

16.
  1. 16) एखादी वस्तू गतिमान असताना कोणत्या भौतिक राशीचे प्रमाण शून्य असू शकते?

a)

वेग

b)

अंतर

c)

विस्थापन

d)

चाल

17.

17) सूर्यप्रकाश 8 मिनिटात पृथ्वीपर्यंत पोहोचतो. तर सूर्य आणि पृथ्वी यामध्ये अंतर किती?

(प्रकाशाचा वेग = 3 × 108 मीटर/सेकंद)

a)

1.44 × 1011 मीटर

b)

1.44 × 108 मीटर

c)

14.4 × 1011 मीटर

d)

14.4 × 108 मीटर

18.

18) शेजारच्या आलेखात गतिमान वस्तूची स्थिती ही अंतर-वेळ ह्या आलेखाने दर्शविली आहे. तर 1 सेकंद आणि 2 सेकंद मधील वस्तूचा वेग किती असेल?

a)

10 मीटर/सेकंद

b)

– 10 मीटर/सेकंद

c)

20 मीटर/सेकंद

d)

0 मीटर/सेकंद

19.

19) न्यूटनच्या गतीच्या कोणत्या नियमामुळे आपण नदीच्या पाण्यात पोहू शकतो?

a)

न्यूटनचा गतीचा पहिला नियम

b)

न्यूटनचा गतीचा दुसरा नियम

c)

न्यूटनचा गतीचा तिसरा नियम

d)

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम

20.

20) रेल्वेगाडी मध्ये बसलेला माणूस इंजिनकडे तोंड करून बसला आहे. तो एक नाणे वर फेकतो. नाणे त्याच्या मागे पडते. तर…

a)

रेल्वेगाडी एकसमान वेगाने पुढे जात असेल

b)

रेल्वेगाडी एकसमान गतीने मागे जात असेल

c)

रेल्वेगाडी त्वरणीत गतीने पुढे जात असेल

d)

रेल्वेगाडी अवत्वरण होऊन पुढे जात असेल

21.

21) विद्युत परिपथ पूर्ण करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक आवश्यक आहे?

a)

स्विच

b)

बॅटरी

c)

विद्युत रोध

d)

वितळतार

22.

22) इलेक्ट्रिक हीटरमध्ये कोणत्या प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर उष्णतेमध्ये होते?

a)

प्रकाश ऊर्जा

b)

ध्वनी ऊर्जा

c)

विद्युत ऊर्जा

d)

यांत्रिक ऊर्जा

23.

23) साध्या विद्युत परिपथात कळ ______ नियंत्रित करते.

a)

व्होल्टेज

b)

विद्युत प्रवाह

c)

बॅटरीचा आकार

d)

विभवांतर

24.

24) विद्युत बल्ब प्रज्वलित होण्यासाठी विद्युतधारेचा कोणता परिणाम जबाबदार आहे?

a)

चुंबकीय परिणाम

b)

औष्णिक परिणाम

c)

रासायनिक परिणाम

d)

चुंबकीय प्रवर्तन

25.

25) जर परिपथातील वाहक तारेतून जास्त विद्युत प्रवाह वाहत असेल तर त्याचा वाहक तारेवर काय परिणाम होईल ?

a)

ती थंड होईल

b)

ती चुंबकीय क्षेत्र तयार करेल

c)

ती तापू शकते आणि जळू शकते

d)

काहीही होणार नाही