wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

5 वी मराठी उतारे, कविता

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालील उतारा वाचून प्र. 1 ते 4 प्रश्नांची उत्तरे द्या. "काल सकाळी रस्त्यावर एक जखमी पक्षी पाहिला. त्याला पहावे म्हणून त्याच्याजवळ जाऊ लागतच तो धडपडत दूर जाऊ लागला व झाडांच्या जाळीत नाहीसा झाला. आपल्याला दुखले, खुपले तर बरे करण्यासाठी जशी डॉक्टरची व्यवस्था असते, तशी व्यवस्था मोकळ्या जंगलातील पक्षी प्राण्यांसाठी नसते. याचा अर्थ ते आजारीच पडत नाहीत, असा नाही. लहान सहान आजार त्यांनाही होतातच, परंतु ते आपली दिनचर्या बदलत नाहीत, जे आवश्यक व उपयुक्त आहे, तेच अन्न ग्रहन करतात. तसेच काही प्राण्यांना तर रोग व त्यावरील औषधे देखील माहित असतात. आहे की नाही गंमत !"

प्र. 1 कोणत्या प्राणी पक्षांसाठी डॉक्टरची व्यवस्था नसते ?

a)

घरातील

b)

जंगलातील

c)

अभयारण्य मधील

d)

बागेतील

2.

दिवसभरात केलेल्या क्रिया यासाठी उताऱ्यात आलेला शब्द निवडा.

a)

व्यवस्था

b)

सकाळी

c)

दिनचर्या

d)

अन्न ग्रहन

3.

खेळताना तुमचा मित्र जखमी झाला तर तुम्ही काय करणार नाही?

a)

डॉक्टरांकडे नेऊ

b)

प्रथमोपचार

c)

मोठ्या व्यक्तींना कल्पना देऊ

d)

दुर्लक्ष करणे

4.

कोणाला रोग व त्यावरील औषधे यांची माहिती असते?

a)

सर्व प्राण्यांना

b)

जंगली प्राण्यांना

c)

काही प्राण्यांना

d)

हिंस्र प्राण्यांना

5.

पुढील कविता वाचून प्र. 5 ते 7 ची उत्तरे द्या.

प्रिय आमुची भारतमाता, आम्ही तिची मुले

रंग वेगळे, गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले!

प्रिय आम्हाला येथील माती, प्रिय हे पाणी झुळझुळते

प्रियकर ही डूलणारी शेते, प्रिय हे वारे सळसळते.

प्र. 1 कवी आम्ही कोणाची मुले असल्याचे सांगत आहेत?

a)

आईची

b)

देवाची

c)

भारतमातेची

d)

पर्याय 1 व 3

6.

गंध या शब्दाला समानार्थी शब्द शोधा.

a)

सुवास

b)

स्वाद

c)

माहिती असणे

d)

छंद

7.

प्रिय हा शब्द कवितेत किती वेळा आला आहे ?

a)

चार

b)

तीन

c)

पाच

d)

सहा

8.

प्र. 8 ते 10 ची उत्तरे संवादाद्वारे द्या.

" सर मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचाय."

"अरे वा ! छान कुठल्या वर्गात आहेस तू? "

"पाचवी क"

"नाव सांग तुझं"

"प्रिन्स संतोष रामाणे"

" ठिक आहे. नाव घेतलं तुझं. छान तयारी करून यायचं बरं का !"

"हो सर, मी सगळं पाठ करीन "

" नुसतं पाठ करून नाही चालणार. समजून घेऊन पाठांतर कर."

प्र. 8 हा संवाद कोठे घडला असावा?

a)

घरी

b)

शाळेत

c)

सभेत

d)

सांगता येत नाही.

9.

प्रिन्सने कोणत्या स्पर्धेत भाग घेतला आहे?

a)

पोहणे

b)

काव्य गायन

c)

नृत्य

d)

वक्तृत्व

10.

शिक्षकांनी कसे पाठांतर करायला सांगितले आहे?

a)

घोकंपट्टी करून

b)

फक्त वाचून

c)

समजून घेऊन

d)

समजून न घेऊन