wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

अपठित उतारा आकलन

Total questions: 1

Worksheet time: 11mins

Name
Class
Date
1-4.

अडचणींनी आणि रोगांनी भांबावून जाण्याचे काय कारण आहे? संकटे ही काही कायमची नसतात ना? मग त्यांच्याकडे सोशिकपणे, खिलाडूवृत्तीने पाहण्याची दृष्टी का असू नये? संकटांचे जेव्हा आपल्यावर आक्रमण होते, तेव्हा ती फार मोठी किंवा असह्य वाटतात; परंतु ती ओसरल्यावर, आपण त्यांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. आपण घाबरतो याचे कारण आपल्याजवळ मनाची स्थिरता किंवा शांती नसते. मनाची शांती नसते याचे कारण अडचणींचे खरेखुरे स्वरूप आपणांस कळलेले नसते. जीवन म्हणजे संकटे नव्हेत, कारण तो असतानाही जीवन चालूच असते. मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नि संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही. आजारी व संकटग्रस्त माणसेही जेव्हा थट्टा-विनोद करतात, तेव्हा ती या आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात

1.

संकटांवर खिलाडूवृत्तीने कसे पाहावे?

a)

संकटांवर रागाने प्रतिक्रिया द्यावी

b)

संकटांवर खिलाडूवृत्तीने प्रतिक्रिया द्यावी

c)

संकटांवर दुर्लक्ष करावे

d)

संकटांवर त्वरित उपाय शोधावा

2.

जीवनाचे मूळ स्वरूप कशामुळे नाहीसे होत नाही?

a)

संकटांमुळे

b)

रोगांमुळे

c)

मळभामुळे

d)

सूर्यामुळे

3.

रोगग्रस्त माणसे थट्टा-विनोद का करतात?

4 lines
4.

१/३ सारांश लिहा.

4 lines