Search Header Logo
कविता

कविता

Assessment

Presentation

Arts

11th Grade

Practice Problem

Medium

Created by

Renu Tare

Used 1+ times

FREE Resource

2 Slides • 4 Questions

1

media

कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्‌मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न काव्यशैली. ‘सहवास’ हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘श्यामली’, ‘चैतू’ हे कथासंग्रह व ‘मृदगंध’, ‘ ्‌मालनगाथा’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

प्राणसई

इंदिरा संत (१९१४ ते २०००)

2

पीठ कांडते राक्षसी तसें कडाडतें ऊन :

प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून?

दिला पाखरांच्या हातीं माझा सांगावा धाडून :

ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून..

पीठ कांडते राक्षसी तसें कडाडतें ऊन :

प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून?

दिला पाखरांच्या हातीं माझा सांगावा धाडून :

ये ग ये ग घनावळी मैत्रपणा आठवून..

बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन,

तोंडे कोमेलीं बाळांचीं झळा उन्हाच्या लागून,

विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग,

मन लागेना घरांत : कधी येशील तू सांग

ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर :

शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नांवर,

तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं :

भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशीं

आळें वेलाचें भिजूं दे, भर विहीर तुडुंब :

सारें घरदार माझें भिजूं दे ग चिंब चिंब;

उभी राहून दारांत तुझ्या संगती बोलेन :

सखा रमला शेतांत त्याचे कौतुक सांगेन..

कां ग वाकुडेपणा हा, कां ग अशी पाठमोरी?

ये ग ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी.

(समग्र इंदिरा संत

3

Fill in the Blanks

Type answer...

4

Fill in the Blanks

Type answer...

5

Fill in the Blanks

Type answer...

6

Fill in the Blanks

Type answer...

media

कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. लहानवयापासून वाङ्‌मयाचे संस्कार. उत्कट, भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न काव्यशैली. ‘सहवास’ हा पहिला प्रकाशित काव्यसंग्रह. ‘शेला’, ‘मेंदी’, ‘मृगजळ’, ‘रंगबावरी’, ‘बाहुल्या’, ‘गर्भरेशीम’ इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. ‘श्यामली’, ‘चैतू’ हे कथासंग्रह व ‘मृदगंध’, ‘ ्‌मालनगाथा’ हे ललित लेखसंग्रह प्रसिद्ध. त्यांच्या ‘गर्भरेशीम’ या कवितासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

प्राणसई

इंदिरा संत (१९१४ ते २०००)

Show answer

Auto Play

Slide 1 / 6

SLIDE