NEW
Font size
Worksheetsमराठी व्याकरण
Total questions: 12
Worksheet time: 6mins
त्याने आज उपवास केला. या वाक्यात 'त्याने ' या सर्वनामाऐवजी कोणते नाम निवडाल ?
बाबांनी
आईने
मालतीने
सुरेशने
मुले घराबाहेर खेळत होती. या वाक्यात असणारे सामान्य नाम सांगा .
मुले
घर
मुले आणि घर
मुले, घर आणि खेळ
नाम किंवा सर्वनामाची विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे ---------.
विशेष शब्द
विशेषण
सर्वनाम
क्रियापद
गावात आमचा मोठा वाडा आहे. या वाक्यात व्याकरणातील कोणता घटक नाही ?
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
या वाक्यात नाम,सर्वनाम,विशेषण व क्रियापद हे सर्व आहेत.
योग्य क्रियापद निवडा .
रजनी खूप सुंदर -------
दिसतो
दिसले
असते
दिसते
योग्य विशेषण निवडा .
समोर -------- जंगल होते.
घट्ट
घनघोर
घनदाट
काळेकुट्ट
योग्य सर्वनाम लिहा.
समीर वेगाने धावला पण ------ जिंकू शकला नाही.
त्याने
ती
तो
त्या
लहान बाळ रंगीत वस्तूकडे बघतच राहिले. विशेषण ओळखा
लहान
रंगीत
लहान , रंगीत
रंगीत, वस्तु
डोंगरावर स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला होता. या वाक्यातील विशेषण कोणते आहे आणि ते कोणासाठी वापरले आहे ?
स्वच्छ हे विशेषण डोंगरासाठी वापरले आहे.
स्वच्छ हे विशेषण सूर्यप्रकाशासाठी वापरले आहे.
स्वच्छ हे विशेषण डोंगर व सूर्यप्रकाशासाठी वापरले आहे.
वरील वाक्यात विशेषणच नाही.
दुर्लभ , सुलभ , बळकट,निर्मळ ,सरिता
वरील गटात न बसणारा शब्द कोणता आहे आणि का ?
सरिता हा शब्द गटात बसत नाही कारण ती नदी आहे.
सरिता हा शब्द गटात बसत नाही कारण ती वाहत आहे.
सरिता हा शब्द गटात बसत नाही कारण ते नाम व बाकीचे शब्द सर्वनामे आहेत.
सरिता हा शब्द गटात बसत नाही कारण ते नाम व बाकीचे शब्द विशेषणे आहेत.
अयोग्य जोडी निवडा .
सागर - समुद्र
सत्य - खरे
हात - हस्त
न्याय - अन्याय
पांढऱ्या कपड्यावर काळे डाग स्पष्ट दिसतात.
या वाक्यात असलेले पांढरा व काळा हे ----------------.
विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत.
दोन्ही विशेषणे आहेत.
दोन्ही रंगाची माहिती देतात.
विरुद्ध अर्थाचे शब्द,विशेषणे आणि रंग विशेष आहेत.
