NEW
Font size
Worksheetsनाम आणि सर्वनाम
Total questions: 8
Worksheet time: 6mins
नामाच्या एकाच प्रकारातील गट निवडा.
मुलगा, सारिका , किल्ला
हिरवळ, चांगला, गाय
कपिला , पुणे , स्वारगेट
डबा , काळजी, आजी
चुकीचे विधान निवडा.
सामान्य नामा ऐवजी सर्वनाम वापरता येते.
भाववाचक नामा ऐवजी सर्वनाम वापरता येते.
विशेष नामा ऐवजी सर्वनाम वापरता येते.
सर्व विधाने बरोबर आहेत.
पुरुष वाचक सर्वनामातील तृतीय पुरुषवाचक हा ......
वक्ता असतो .
श्रोता असतो.
वक्ता व श्रोता असतो.
वक्ता वा श्रोता दोन्हीही नसतो.
? हे विरामचिन्ह ------------- सर्वनाम प्रकारात आवश्यक असते.
संबंधी
पुरुषवाचक
दर्शक
वरीलपैकी एकही नाही.
चांगल्या माणसांना नेहमी वाईट वागवले जाते.
या वाक्यात खालील नामाचे प्रकार आहेत.
सामान्य
सामान्य व भाववाचक
विशेष व भाववाचक
सर्व पर्याय चुकीचे आहेत.
ते झाड माझ्या घरासमोरच आहे.
या वाक्यात आलेली सर्वनामे आहेत....
तृतीय व प्रथम पुरुष
दर्शक व द्वितीय पुरुष
संबंधी व प्रथम पुरुष
दर्शक व प्रथम पुरुष
तो डोंगर आणि ते शेत आमचेच आहे.
दर्शक सर्वनाम सांगा.
तो
ते
तो, ते व आमचे
तो व ते
बाबांनी मुलांसाठी काय खाऊ आणला ?
सर्वनाम प्रकार सांगा.
अनिश्चित
प्रश्नवाचक
संबंधी
सर्व पर्याय चूक आहेत
