wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Rapid Fire

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

वय वर्ष २६ असलेले बास्केट बॉल प्रशिक्षक,जे विवाहित आहेत, त्यांना मुले नाहीत. त्यांनी आपले शिक्षण Physical education मध्ये पूर्ण केले आहे. त्यांना पिआनो आणि चित्रकलेची आवड आहे.

वरील वर्णनावरून ही व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे ओळखा.

a)

स्त्री

b)

पुरुष

c)

सांगता येत नाही.

2.

एका घरी लहान बाळाचा जन्म झाला आहे. त्याच्या बारशाला पुढील भेटवस्तू मिळाल्या आहेत. जसे बाहुली, झबली, टोपडी, खुळखुळा इ. त्यावरून ते बाळ मुलगा आहे की मुलगी असे तुम्हाला वाटते.

a)

मुलगी

b)

मुलगा

c)

सांगता येत नाही

3.

समानता राखण्यासाठी घरातील प्रत्येक कामाची विभागणी समसमानच झाली पाहिजे ?

a)

मान्य

b)

अमान्य

c)

सांगता येत नाही

4.

महिलांना कार चालविण्याची समज जरा कमीच असते

a)

मान्य

b)

अमान्य

c)

सांगता येत नाही

5.

मुलीनी दिसायला नाजूक असायला हवे तर मुलांनी दणकट दिसणे गरजेचे आहे

a)

मान्य

b)

अमान्य

c)

सांगता येत नाही

6.

रात्रीच्या वेळी मुलीनी बाहेर जाताना वडील, मुलगा, भाऊ, मित्र यांना बरोबर घेऊनच बाहेर पडावे म्हणजे भीती वाटणार नाही.

a)

मान्य

b)

अमान्य

c)

सांगता येत नाही

7.

मुलीना गुलाबी रंगांचे कपडे मुलग्यांपेक्षा जास्त छान दिसतात.

a)

मान्य

b)

अमान्य

c)

सांगता येत नाही

8.

घरातील मुलगा हिमालयात ट्रेकिंगला जाण्यासाठी परवानगी मागतो. वडील खर्चा संदर्भात चौकशी करतात आणि परवानगी देतात. मुलीला जंगल सफारी साठी जायचे आहे पण वडिलांनी परवानगी नाकारली. वडिलांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटते?

a)

काळजी करणारी

b)

पूर्वग्रहदुषित

c)

माहिती नाही

9.

सहा वर्षाच्या मुलीला तुम्ही या पैकी काय भेटवस्तू द्याल ?

a)

बाहुली

b)

बॉल आणि इतर क्रिकेट खेळण्याचे सामान

10.

एक आर्किटेक्ट आहेत त्यांना खेळाची आणि फिरण्याची आवड आहे. विविध ठिकाणे आणि त्यांची माहिती मिळविण्याचा छंद आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच ते मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

वरील वर्णनावरून ही व्यक्ती स्त्री असेल की पुरुष ते ओळखा

a)

स्त्री

b)

पुरुष

c)

सांगता येत नाही