wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

About myself

Total questions: 6

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

हे अगदी माझे वर्णन आहे असे मला वाटते:

a)

मी चांगल्या प्रकारे करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी माझ्यामध्ये आहेत

b)

माझ्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तितक्या चांगल्या करू शकत नाही

c)

मी बरं करतो, पण बाकीचे लोक त्याच गोष्टी माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या प्रकारे करतात

2.

मी जेव्हा माझी तुलना इतरांसोबत करतो:

a)

बहुतेक वेळा माझ्याविषयी मला माझ्याविषयी छान वाटतं.

b)

सहसा मला माझ्याविषयी ठीक वाटतं.

c)

बहुतेक वेळा माझ्याविषयी मला माझ्याविषयी वाईट वाटतं.

3.

जेव्हा परिपूर्णतेचे (being perfect) निकष लावण्याचा मुद्दा येतो:

a)

परिपूर्ण असण्यासाठी मी माझ्यावर खूप दबाव टाकतो. प्रत्येक गोष्टीत मी सर्वोत्तमच असायला हवं.

b)

मला त्याची फारशी काळजी वाटत नाही. मी फक्त माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो.

c)

इतर लोक माझ्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करतात. त्यामुळे माझ्याकडून तसे न झाल्यास मी त्यांना निराश करीन असे मला वाटते.

4.

जेव्हा माझ्याकडून चूक होते:

a)

तेव्हा मी ती सहसा मान्य करत नाही.

b)

मी ती गोष्ट करणं सोडून देतो. जर मला वाटत असेल की मी एखादी गोष्ट चांगले करणार नाही तर मी त्या वाटेलाच जात नाही.

c)

मी चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. जर ते शक्य नसेल, तर त्याचा विचार करणे सोडून देतो; मात्र पुन्हा संधी मिळाली तर ती गोष्ट अधिक चांगली करायचे ठरवतो.

5.

जेव्हा मी नवीन लोकांना भेटतो:

a)

तेव्हा ते मला स्वीकारणार नाहीत याची मला काळजी वाटते.

b)

मी अशी अपेक्षा ठेवतो की मी त्यांना आवडेन आणि मी जसा आहे तसा ते माझा स्वीकार करतील.

c)

मी सुरुवातीला हातचं राखूनच वागतो. मी नक्की कसा आहे हे अंदाज घेतच उघड करतो.

6.

माझ्या आयुष्यातले लोक:

a)

माझ्याविषयी चिकित्सक आहेत आणि फारसे प्रेमळ नाहीत.

b)

मला खऱ्या प्रकारे ओळखत नाहीत./ मी नक्की कसा आहे हे त्यांना माहीतच नाही.

c)

माझे गुण जाणतात आणि मला ते जाणवून देऊन त्याचे कौतुकही करतात.