Worksheets5.8.1 रांगेतील स्थान
Total questions: 6
Worksheet time: 4mins
हजेरीपत्रकात विपुल आणि संध्या यांच्या दरम्यान 19 विद्यार्थ्यांची नावे नोंदलेली आहेत. विपुलचा क्रमांक शेवटून 25 वा आणि संध्याचा क्रमांक सुरुवातीपासून 13 वा आहे. तर वर्गात एकूण किती मुले आहेत?
55
56
57
58
एका रस्त्याच्या कडेला सायकल, स्कूटर, मोटार, ऑटोरिक्षा, टांगा या क्रमाने एका ओळीत 59 वाहने उभी केली आहेत. तर यातील तेहतिसाव्या स्थानावर कोणते वाहन असेल?
सायकल
टांगा
ऑटोरिक्षा
मोटार
एका रांगेत मनोहरच्या डावीकडे वैशाली असून त्यांच्या दरम्यान तीन व्यक्ती उभ्या आहेत. मनोहर रांगेच्या उजवीकडून सहाव्या स्थानावर उभा आहे. वैशाली रांगेच्या डावीकडून दहाव्या स्थानावर उभी आहे. याच रांगेत प्रियांका उजवीकडून आठव्या स्थानावर उभी आहे. तर रांगेच्या डावीकडून ती कोणत्या क्रमांकावर उभी आहे.
11
12
13
14
बसच्या एका रांगेत 41 व्यक्ती आपल्या डावीकडे तोंड करून उभ्या आहेत. तर मध्यभागी असलेल्या पियुषच्या स्थानाच्या उजवीकडे बाराच्या स्थानावर उभ्या असलेल्या अंबरचा रांगेच्या उजवीकडून क्रमांक किती असेल?
आठवा
बत्तीसावा
एकतिसावा
नववा
हजेरीपटावर हेमांगीचा क्रमांक 11 आणि अजयचा क्रमांक शेवटून 18 आहे. हेमांगी आणि अजय यांच्या दरम्यान 26 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. तर हजेरीपटावर मध्यभागी क्रमांक असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती असेल?
27
28
29
26
एका समारंभानिमित्त लावलेल्या सजावटीत 17 पताका नारिंगी रंगाच्या आहेत. या पताकांच्या पुढे सहापट पताका निळ्या रंगाच्या आहेत. तर मध्यभागी असलेल्या पताकाचा क्रमांक कितवा?
57
61
59
60
