wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रकरण क्र 6. प्रकाशाचे अपवर्तन

Total questions: 30

Worksheet time: 50mins

Name
Class
Date
1.

प्रकाश किरण तिरकस मार्गाने हवेतून पाण्यात जाताना--------- झुकतो.

4 lines
2.

प्रकाश किरण तिरकस मार्गाने बेंझीन मधून हवेत जाताना --------- जातो.

4 lines
3.

काचेच्या तांबड्या प्रकाशाची चाल जांभळ्या ---------- असते.

4 lines
4.

प्रकाशाची काचे मधील चाल पाण्यामधील ---------- असते.

4 lines
5.

सूर्यप्रकाशाचे पाण्याच्या लहान थेंबामुळे अपवर्तन, अपस्करण,------------ व पुन्हा अपवर्तन झाल्याने इंद्रधनुष्य निर्माण होते.

4 lines
6.

सूर्यप्रकाशाचे काचेच्यालोलकामुळे अपस्करण होताना --------- प्रकाशाचे विचलन सर्वात कमी होते.

4 lines
7.

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणा ची दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस -------- म्हणतात.

a)

प्रकाशाचे अपस्करण

b)

प्रकाशाचे विकिरण

c)

प्रकाशाचे अपवर्तन

d)

प्रकाशाचे परावर्तन

8.

जेव्हा एखादा प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीमध्ये शिरताना पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करतो तेव्हा तो --------

a)

स्तंभिकेकडे झुकतो

b)

स्तंभिकेपासून दूर जातो

c)

न वळता सरळ जातो

d)

नागमोडी जातो

9.

एखादा प्रकाश जेव्हा घनमाध्यमातून विरळमाध्यमात जाताना दोन माध्यमांच्या सीमेवर लंब रेषेत आपाती होतो, तेव्हा आपाती कोन -------- असतो.

a)

b)

30º

c)

60º

d)

90º

10.

एक प्रकाश किरण एका काचेच्या तिच्या पृष्ठभागावर पृष्ठभागाशी 50 अंश कोनामध्ये आदळतो, तर त्याचा आपाती कोन -------- अंशाचा असेल.

a)

50

b)

25

c)

40

d)

100

11.

एक प्रकाश किरण हवेतून काचेच्या लादीत शिरताना लादीच्या पृष्ठभागाशी 60 अंशाचा कोन करतो, तर अपवर्तीत कोन------- असेल.

a)

30º पेक्षा जास्त

b)

30º पेक्षा कमी

c)

60º

d)

30º

12.

अपवर्तन क्रियेत हवेतून काचेत तिरकस मार्गाने जाणारा प्रकाश किरण --------

a)

स्तंभिकेकडे झुकतो

b)

स्तंभिकेपासून दूर जातो

c)

स्तंभिकेला लंब होतो

d)

स्तंभिकेला समांतर असतो

13.

काचेच्या लादीवर प्रकाश किरण तिरकस मार्गाने पडले असता आपाती किरण आणि अपवर्तीत किरण -------- असतात.

a)

लंब

b)

समांतर

c)

विरुद्ध दिशेत

d)

छेदणारे

14.

एक प्रकाश किरण एका काचेच्या लादीच्या पृष्ठभागावर 40ºआपाती कोन करतो ,तर अपवर्तीत कोन 40º -------- असेल.

a)

पेक्षा अधिक

b)

पेक्षा कमी

c)

एवढाच

d)

च्या दुप्पट

15.

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणा ची दिशा बदलण्याचे कारण -----------हे होय.

a)

प्रकाशाच्या रंगातील बदल

b)

प्रकाशाच्या वारंवारतेमधील बदल

c)

प्रकाशाच्या वेगाला मधील बदल

d)

प्रकाशाच्या प्रखरतेमधील बदल

16.

जेव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकातून सात रंगात अपस्करण होते तेव्हा ---------रंगाचे विचलन सर्वात कमी होते.

a)

निळ्या

b)

तांबड्या

c)

पिवळ्या

d)

हिरव्या

17.

पुढीलपैकी --------- या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे.

a)

हिरा

b)

क्राऊन काच

c)

माणिक

d)

बर्फ

18.

प्रकाशाचे आपल्या घटक रंगांमध्ये पृथक्करण होण्याच्या घटना प्रकाशाचे ------- म्हणतात.

a)

अपस्करण

b)

विकिरण

c)

अपवर्तन

d)

परावर्तन

19.

निरपेक्ष अपवर्तनांक------------

a)

डायाँप्टर मध्ये व्यक्त करतात

b)

m/s मध्ये व्यक्त करतात

c)

हवेसाठी जवळजवळ 4/3 असतो

d)

या राशीला एक नसते

20.

प्रकाशाची निर्वात पोकळीतील चाल c , माध्यमाचा अपवर्तनांक n व माध्यमातील प्रकाशाची चाल v यांतील संबंध ------- हा होय.

a)

v = cn\frac{c}{n}

b)

v=cn

c)

v = nc\frac{n}{c}

d)

v= cn\sqrt[]{\frac{c}{n}}

21.

अभिसारी प्रकाशकिरणांच्या मार्गात एक काचेची लादी ठेवली,तर अभिसारी किरण एकवटण्याचा बिंदू-----------

a)

लादी पासून दूर जातो

b)

लादीकडे वळतो

c)

त्याच ठिकाणी राहतो

d)

उभ्या बाजूने सरकतो

22.

LASER ( लेझर ) हे ----------चे संक्षिप्त रूप आहे.

a)

light amplification by stimulated emission of radiation

b)

light and sound energy radiation

c)

Light and stimulated energy radiation

d)

Light amplification by sound energy radiation

23.

व्याख्या लिहा. प्रकाशाचे अपवर्तन -----

4 lines
24.

प्रकाशाच्या अपवर्तनाचे निसर्गात आढळणारी दोन उदाहरणे लिहा.

4 lines
25.

आपाती कोन 0 असताना अपर्तीत कोन किती असतो?

4 lines
26.

प्रकाशाच्या अपवर्तनात sin isin r\frac{\sin\ i}{\sin\ r} =स्थिरांक . या स्थिरांक कस काय म्हणतात?

4 lines
27.

काचेच्या लोलकामुळे सूर्य प्रकाशाचे अपस्करण होताना कोणत्या रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात कमी असते?

4 lines
28.

काचेच्या लोलकामुळे सूर्य प्रकाशाचे अपस्करण होताना कोणत्या रंगाच्या प्रकाशाचे विचलन सर्वात जास्त असते?

4 lines
29.

जांभळा प्रकाश किरणांची तरंगलांबी साधारण किती असते?

4 lines
30.

क्रांतीक कोन -व्याख्या लिहा .

4 lines