Font size
Worksheets5.1.2 दहा अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन
Total questions: 30
Worksheet time: 30mins
अक्षरात लिहा.
7,04,25,00,007
सात अब्ज चार लक्ष पंचवीस हजार सात
सात अब्ज चार कोटी पंचवीस लक्ष सात
सातशे चार कोटी पंचवीस हजार सात
सात अब्ज चारशे पंचवीस हजार सात
अंकात लिहा.
पाच अब्ज सतरा कोटी बारा लक्ष अकरा हजार सातशे पंधरा
5,16,11,715
5,17,12,715
5,17,12,11,715
5,17,12,11,700,15
6 कोटी ही संख्या लिहिलेला खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
60,00,000
6,00,000
6,000
6,00,00,000
1,00,000 चे योग्य वाचन कोणते ?
100 दशहजार
1 लक्ष
10 हजार
10 लक्ष
अंकात लिहा.
साडे पंधरा हजार
1550
15000500
15500
155000
क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधून तिचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा.
37712640, ---------?---------, 37712642
तीन कोटी सत्याहत्तर लक्ष बारा हजार सहाशे चाळीस
तीन कोटी सत्याहत्तर लक्ष बारा हजार सहाशे बेचाळीस
तीन कोटी सत्याहत्तर लक्ष बारा हजार सहाशे एकोणचाळीस
तीन कोटी सत्याहत्तर लक्ष बारा हजार सहाशे एक्केचाळीस
'साडे चार लक्ष' ही संख्या कशी लिहावी ?
45,00,000
4,50,000
4,500
45,000
'सही अंकी संख्या' एकूण किती आहेत ?
9,99,999
90,000
9,00,000
99,999
'एका शाळेतील विद्यार्थ्यांनी 'वनीकरण' या उपक्रमाच्या अंतर्गत 42,500 बिया जमा केल्या.
42,500 चे अक्षरी लेखन खालीलपैकी कोणते योग्य नाही ?
साडे बेचाळीस हजार
चारशे पंचवीस शतक
सव्वा चार लक्ष
बेचाळीस हजार पाचशे
बारा लक्ष बाराशे बारा = ?
121212
1201212
12001312
121312
'तीन कोटी सत्याहत्तर लक्ष अकरा हजार सहाशे नव्याण्णव' या संख्येनंतर लगेच येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती ?
3,77,00,00,700
3,77,11,00,699
3,77,11,700
3,00,77,11,700
'10,00,000' च्या लगतची मागील क्रमिक संख्या कोणती ?
99,99,999
9,99,999
99,999
20,00,000
क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधून तिचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा.
20,00,021; 20,00,020; ? ; 20,00,018
वीस लक्ष एकवीस
वीस हजार एकोणवीस
वीस लक्ष बावीस
वीस लक्ष एकोणवीस
पंधरा लक्ष + पंधरा हजार + पंधराशे + पंधरा
म्हणजे पुढीलपैकी कोणती संख्या ?
15,17,515
1,51,50,015
15,16,515
1,51,515
क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधून तिचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा.
30,01,100 ; 30,01,000 ; ? ; 30,00,800
तीस लक्ष एक हजार दोनशे
तीस लक्ष नऊशे
तीस हजार नऊशे
तीस हजार सातशे
एका बेटावरील लोकसंख्या 4,16,00,17,318 आहे.
ही लोकसंख्या शब्दांत कशी लिहावी ?
चार अब्ज सोळा लक्ष सतरा हजार तीनशे अठरा
चार अब्ज सोळा कोटी सतरा लक्ष तीनशे अठरा
चार अब्ज सोळा कोटी सतरा हजार तीनशे अठरा
चारशे सोळा कोटी सतरा लक्ष तीनशे अठरा
एका सहकारी पतसंस्थेकडे 'नऊ कोटी चोवीस लक्ष साठ हजार' रकमेच्या ठेवी जमा आहेत.
ही रक्कम दर्शवणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
9246000
92460000
924600
924060000
खालील पर्यायातील कोणती संख्या '500000' ही संख्या दर्शवत नाही ?
500 हजार
5000 शतक
50 लक्ष
5 लक्ष
'सव्वा पस्तीस हजार' म्हणजे किती ?
35500
35250
3525
352500
'पाचशे रुपयाच्या शंभर नोटा' म्हणजे किती रुपये ?
5000 रुपये
अर्धा शेकडा रुपये
500000 रुपये
अर्धा लाख रुपये
क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधून तिचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा.
? ; 4,57,18,340 ; 4,57,18,330 ; 4,57,18,320
चार कोटी सत्तावन्न लक्ष अठरा हजार तीनशे एक्केचाळीस
चार कोटी सत्तावन हजार अठरा लक्ष तीनशे पन्नास
चार कोटी सत्तावन्न लक्ष अठरा हजार तीनशे पन्नास
चार कोटी सत्तावन्न लक्ष अठरा हजार तीनशे साठ
योग्य्ा जोडी ओळखा.
साडे चौदा हजार = 1450
सव्वा चौदा हजार = 1425
पावणे चौदा हजार = 14750
साडे चौदाशे = 1450
सतरा हजार + सतराशे + सतरा = ?
171717
1700017
18717
17170017
चिन्मयने साडे चार लाखाची मोटार घेण्यासाठी काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून जमा केली. ती रक्कम देताना त्याने 1000 रुपयाच्या 100 नोटा आणि 500 रुपयाच्या 100 नोटा जमा केल्या.
तर ॲडव्हान्स दिलेली रक्कम पुढीलपैकी कोणती ?
पंधरा हजार
दीड लाख
दीड हजार
पंधरा शतक
8 कोटी = ?
80 दशलक्ष
800 हजार
800 दशलक्ष
8000 हजार
2,50,000 या संख्येचे वाचन कोणते ?
(एक किंवा अधिक पर्याय असू शकतात.)
दोन लाख पन्नास हजार
अडीच लाख
अडीचशे हजार
दोनशे पन्नास हजार
'नऊ लक्ष सात दशहजार चार हजार तीन दशक'
ही संख्या अंकात मांडा.
970430
974030
974300
907430
6 अंकी सर्वात मोठी सम संख्येचे वाचन दर्शविणारा पर्याय कोणता ?
नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव
नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव
नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव
नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव
चुकीची जोडी ओळखा.
साडे पंचवीसशे = 2550
साडे पंचवीस हजार = 25500
सव्वा पंचवीसशे = 2525
साडे पंचवीस लक्ष = 255000
60,00,000 चे योग्य वाचन कोणते ?
6 दशलक्ष
6 कोटी
6 लक्ष
6 दशहजार
