wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

भाषांतरविद्या

Total questions: 20

Worksheet time: 31mins

Name
Class
Date
1.

साहित्यातून प्रामुख्याने_________ प्रकट झाल्याने व त्या सार्वत्रिक असल्यामुळे कोणत्याही साहित्यकृतीचे भाषांतर अशक्य नसते.

a)

लौकिक जीवन

b)

अलौकिक जीवन

c)

मानवी भावना

2.

"मूळ कृतीशी प्रामाणिक राहून केलेली शब्दशः निर्मिती म्हणजे भाषांतर होय."

a)

भालचंद्र नेमाडे

b)

डॉ. रवींद्र किंबहूने

c)

वि. का. राजवाडे

3.

भाषांतराचा उद्देशानुसार पडणारा प्रकार कोणता?

a)

मौखिक भाषांतर

b)

पूरक भाषांतर

c)

लक्ष्यनिष्ठ भाषांतर

4.

__________ ग्रंथांना मंत्राक्षाराचा दर्जा प्राप्त झालेला असतो त्यामुळे अशा ग्रंथांच्या भाषांतरामध्ये कानामात्राच्या चुकासुद्धा खपवून घेत नाहीत.

a)

धार्मिक ग्रंथ

b)

वैचारिक ग्रंथ

c)

विदेशी ग्रंथ

5.

वैचारिक ग्रंथाची भाषा ______ असते.

a)

दैवी आणि मंत्रित

b)

प्रगल्भ आणि आवाहक

c)

बोली आणि ग्रामीण

6.

__________ यालाच दुभाष्याचे भाषांतर असेही संबोधले जाते.

a)

यांत्रिक भाषांतर

b)

मौखिक भाषांतर

c)

लिखित भाषांतर

7.

प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, कसबानुसार भाषांतराचे स्वरूप बदलत असते त्यामुळे भाषांतराला ________ म्हणणेच योग्य ठरते.

a)

शास्त्र

b)

मंत्र

c)

कला

8.

ग्राहकाच्या मनावर विशिष्ट परिणाम घडवून आणण्याच्या हेतूने जेव्हा संदेशन होते तेव्हा त्याचे स्वरूप हे ________ असते.

a)

आविष्कारात्मक

b)

परिसरनिष्ठ

c)

परिणामनिष्ठ

9.

एकमेकींपासून ऐतिहासिक, भाषिक, सांस्कृतिक, सामाजिकदृष्ट्या लांब असलेल्या भाषांच्या बाबतीत भाषांतर करताना बऱ्याचदा अडथळे निर्माण होतात, तेव्हा इथवर भाषांतरकर्त्याला भाषांतराचे ________ लक्षात घ्यावे लागतात.

a)

महत्त्व

b)

परिसर

c)

उद्देश

10.

सोस्युरच्या मते भाषिक चिन्हे एकमेकांना निगडित असतात किंवा एकमेकांवरती अवलंबून असतात त्यामुळे भाषांतर करताना भाषांतरकर्त्याने ________ तपासली पाहिजे.

a)

अर्थाची सममूल्यता

b)

भाषांतरणियता

c)

भाषिक कृती

11.

एरिब याकोबसन या अभ्यासकाने असे स्पष्टपणे नमूद केले आहे की, 'भाषांतर करणे' ही _______ लोकांनी शोधलेली कला आहे.

a)

याकोब

b)

रोमन

c)

प्रगत

12.

परभाषेतील ज्ञान ग्रहण करणे आणि आपल्या भाषेतील काव्याचे आकृतीबंध विकसित करत जाणे ही भाषांतरामागाची प्रयोजने कोणी सांगितलेली आहेत?

a)

जॉन विकिलफ

b)

विल्यम टेंडेल

c)

सिसेरो व होरॅस

13.

भाषांतरकाराने शब्दांची निवड चोखंदळपणे करून योग्य तो परिणाम साधण्याच्या दृष्टीने मांडणी करावी हे भाषांतराविषयी तत्व कोणी मांडले?

a)

डोलेट

b)

पुर्व्हे

c)

जॉर्मेने

14.

"भाषांतर ही एका संहितेची एका भाषिक सांस्कृतिक आवरणातून दुसऱ्या आवरणात स्थानांतरण करणारी द्वैभाषिक प्रक्रिया आहे" हे मत कोणाचे?

a)

दि. पु. चित्रे

b)

भालचंद्र नेमाडे

c)

श्री. म. माटे

15.

खालील पर्यायांपैकी भाषांतराच्या प्रक्रियेचा योग्य क्रम निवडा.

a)

आकलन, स्थानांतरण, पुनर्निर्मिती

b)

आकलन, पुनर्निर्मिती, स्थानांतरण

c)

स्थानांतरण, पुनर्निर्मिती, आकलन

16.

ललित साहित्यकृतीची निर्मिती करताना लेखक ज्या मानसिक अवस्थेतून गेला, जे भावनिक चढउतार त्याने अनुभवले ते सारे भाषांतरकाराला प्रत्यक्ष अनुभवावे लागतात. तरच तो भाषांतरित कृतीमध्ये त्याच तीव्रतेने त्या भावनांचा आविष्कार करू शकतो.

a)

पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

b)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर

c)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक

17.

ललित साहित्याच्या भाषांतरापेक्षा ललित्तेतर वाड्म़याच्या भाषांतराला व्यावहारिक निकड प्रामुख्याने चालना देत असते. त्यामुळे भाषांतरकाराने आत्मियता आणि आंतरिक इच्छा हे गुण नसले तरी चालते.

a)

पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

b)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर

c)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक

18.

भाषांतरीत करण्यासाठी घेतलेले साहित्य हे लेखकाचे स्वतःचे अपत्य असते. त्यामुळे भाषांतर करताना भाषांतरकर्त्याने मूळ कृतीवर आपली मते लादण्याचा प्रयत्न करू नये.

a)

पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

b)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर

c)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक

19.

ललित साहित्यकृतीमध्ये लेखकाची तसेच समाजाची सामूहिक मानसिकता प्रकट झालेली नसते. त्यामुळे भाषांतरकाराला मानसशास्त्र, समाजशास्त्र यांची जाण नसली तरी काही हरकत नसते.

a)

पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

b)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर

c)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक

20.

लिखित भाषांतरामध्ये भाषांतरकाराला भाषांतर करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात असल्यामुळे घाई करावी लागत नाही. त्याचबरोबर त्याच्यावरती वेळेचे बंधन अजिबात नसते.

a)

पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

b)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर

c)

पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही चूक