Worksheetsबलवान कोण
Total questions: 10
Worksheet time: 5mins
प्रश्न १. खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून शोधा
१. चिमणीचे घरटे कुठे होते?
झाडावर
घरावर
पंख्यावर
२. चिमणीच्या घरट्यात किती अंडी होती?
एक
दोन
तीन
३. आपले शरीर झाडाला कोण घासत होते?
चिमणी
मुंगी
हत्ती
४. चिमणीने हत्तीला काय विनंती केली?
झाडाला चावू नकोस.
झाडावर चढू नकोस.
झाडावर अंग घासू नकोस.
५. हत्तीने कोणाचे ऐकले नाही?
मुंगीचे
चिमणीचे
झाडाचे
६. हत्तीने झाड हलविल्यामुळे काय झाले?
चिमणी खाली पडली.
चिमणीचे घरटे खाली पडून त्यातली दोन अंडी फुटली.
मुंगी खाली पडली.
७. ‘बलवान कोण’ या पाठात कोण रडू लागले?
हत्ती
मुंगी
चिमणी
८. चिमणी का रडू लागली?
तिची अंडी खाली पडून फुटल्यामुळे
तिला खूप भूख लागल्यामुळे
तिला रडायला आवडत असल्यामुळे
९. मुंगीने कोणाला वचन दिले?
हत्तीला
चिमणीला
झाडाला
१०. हत्तीला कोणी धडा शिकविला?
मुंगीने
चिमणीने
झाडाने
