NEW
Font size
WorksheetsUnit-3 अन्य साधनाचे उत्पन्न व कपाती
Total questions: 15
Worksheet time: 8mins
खालीलपैकी कोणते उत्पन्न "अन्य साधनापासून उत्पन्न" या शिर्षकाअंतर्गत करयोग्य नाही.
अ. सहकारी समितीकडून प्राप्त लाभांष
ब. शब्दकोड्याची बक्षिस
क. व्यवसायाची ख्याती विक्रीवर लाभ
ङ. बँकेकडून व्याज
एका व्यक्तिला 60,000 रु. फॅमिली पेंशन मिळाली. त्याला प्रमाप कपात ----- मिळेल.
अ. 20,000 रु
ब. 25,000 रु
क. 40,000 रु
ड. 15,000 रु
एखाद्या गृहसंपत्तीला भाडेकरुद्वारे पुन्हा भाड्याने दिले असल्यास मिळणारे उत्पन्न हे ----- या शिर्षकाअंतर्गत येईल.
अ. अन्य साधनापासून उत्पन्न
ब. गृहसंपत्तीपासून उत्पन्न
क. करमुक्त राहील
ड. पूंजी लाभ
अन्य साधनापासून उत्पन्न या शिर्षकाअंतर्गत करयोग्य फॅमिली पेंशन मधून ----- एवढी कपात मिळेल
अ. पेंशनच्या 1/3
ब. पेंशनच्या 30% अथवा 15,000 रु यापैकी कमी
क. पेंशनच्या 1/3 अथवा 15,000 रु यापैकी कमी
ड. शून्य
धारा 80 DD अंतर्गत अपंगत्वासंबंधी ----- राशीची कपात स्विकृत होते.
अ. 50,000 रु
ब. 75,000 रु
क. शून्य
ड. वास्तविक व्यय
खालीलपैकी कोणत्या देगणीकरीता 100% कपात स्विकृत होते?
अ. प्रधानमंत्री अनावृष्टी सहाय्यता निधी
ब. राष्ट्रीय क्रिडा निधी
क. राजीव गांधी फाऊंडेशन
ड. जवाहरलाल नेहरु स्मृतीकोष
धारा 80 C ची कपात ----- यांना लागू होते.
अ. व्यक्ती व संयुक्त हिंदू कुटूंब
ब. सार्थ
क. सहकारी समिती
ड. कंपनी
आयकराच्या ----- धारेअंतर्गत प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता निधीला दिलेल्या देणगीला एकुण सकल उत्पन्नातून 100% कपात मिळते.
अ. 80 C
ब. 80 G
क. 80 GG
ड. 80 D
करनिर्धारण वर्ष 2022-23 करीता धारा 80 C अंतर्गत ----- कपात स्विकृत होते.
अ. 79,000 रु
ब. 1,12,000 रु
क. 1,50,000 रु
ड. 80,000 रु
धारा 80 D अंतर्गत ----- स्विकृत होते.
अ. उच्च शिक्षणाकरीता घेतलेल्या रुणाची परतफेड
ब. आश्रीत अपंगाकरीता केलेले वैद्यकिय व्यय
क. वैद्यकिय विमा हप्त्याचे शोधन
ड. यापैकी नाही
धारा 80 E अंतर्गत उच्च शिक्षणाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याजाची मर्यादा ----- रु. आहे.
अ. 20,000
ब. 25,000
क. 30,000
ड. पूर्ण राशी
एखाद्या व्यक्तिने स्वत:चा वैद्यकिय विमा हप्ता 10,000 रु. रोखिने भरला असल्यास त्याला धारा 80 D अंतर्गत ------ कपात स्विकृत होते.
अ. 5,000 रु
ब. 10,000 रु
क. 15,000 रु
ड. शून्य
धारा 80 E अंतर्गत ---- कपात मिळते.
अ. देणगी करीता
ब. वैद्यकिय व्ययाकरीता
क. उच्च शिक्षणाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या शोधनाकरीता
ड. यापैकी नाही
धारा 80 C ची कपात ----- यांना स्विकृत होत नाही.
अ. व्यक्ती
ब. हिंदू अविभक्त कुटुंब
क. कंपनी
ड. वरील सर्वांना
उत्पन्नाच्या सर्व शिर्षकांची बेरीज म्हणजे -----
अ. एकूण सकल उत्पन्न
ब. एकुण उत्पन्न
क. करदेय उत्पन्न
ड. समायोजित उत्पन्न
