NEW
Font size
Worksheetsअणूचे अंतरंग
Total questions: 25
Worksheet time: 25mins
द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्या कणांना महर्षी कणाद यांनी कोणते नाव दिले?
अणू
रेणू
परमाणू
इलेक्ट्रॉन
डेमोक्रिटस या ग्रीक तत्ववेत्याने द्रव्य ज्या लहान कणाचे बनलेले असते त्या कणांना कापता येत नाही म्हणून त्याला काय नाव दिले?
Atmosphere
Atom
Molecule
Nucleons
अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋण प्रभारीत कणांचा म्हणजेच इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?
जॉन डाल्टन
जे जे थॉमसन
अर्नेस्ट रुदरफोर्ड
नील्स बोर
रुदरफोर्डच्या अनुप्रारूपातील अणू अस्थायी असल्याची त्रुटी.........यांनी 1913 साली मांडलेल्या अनुप्रारुपाने दूर झाली.
जॉन डाल्टन
सर जे जे थॉमसन
नील्स बोर
डेमोक्रिटस
अणूच्या केंद्रकांतील प्रोटॉनच्या संख्येला काय म्हणतात?
अणूवस्तुमानांक
अणुअंक
इलेक्ट्रॉन संरूपण
संयुजा
अणूमधील.... व........ यांची एकत्रित संख्या म्हणजे अणूवस्तुमानांक होय.
प्रोटोन व इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन व न्यूट्रॉन
प्रोटोन व न्युट्रॉन
यांपैकी नाही
अणूअंक व अणूवस्तूमानांक अनुक्रमे.... आणि..... या अक्षरानी दाखवतात.
Z आणि A
A आणि Z
P+ आणि e-
यांपैकी नाही
कवचातील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्स ची संख्या कोणत्या सूत्राने काढतात?
2n²
n²
2n²+1
2n²-1
खालीलपैकी योग्य सूत्र निवडा.
अणूअंक + अणूवस्तूमानांक = न्यूट्रॉन्सची संख्या
अणूअंक - अणूवस्तूमानांक = न्यूट्रॉन्सची संख्या
अणूवस्तूमानांक - अणूअंक = न्यूट्रॉन्सची संख्या
A - Z =n(p)
कक्षा आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्सची संख्या यांची चुकीची जोडी निवडा.
K - 2
L - 8
M - 16
N - 32
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉन्सची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे..... होय.
संयुजा
इलेक्ट्रॉन संरूपण
संयुजा इलेक्ट्रॉन
यांपैकी नाही
हें कोणत्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आहे?
हेलिअम
ऑक्सिजन
सोडीअम
क्लोरीन
एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे.... होय.
संयुजा इलेक्ट्रॉन
इलेक्ट्रॉन
संयुजा
इलेक्ट्रॉन संरूपण
काही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणू बरोबर संयोग पावत नाहीत त्यांना... म्हणतात.
धातू मुलद्रव्य
अधातू मुलद्रव्य
धातू सदृश्य मूलद्रव्य
निष्क्रिय मूलद्रव्य
पुढीलपैकी कोणते निष्क्रिय मुलद्रव्य नाही?
हेलिअम
हायड्रोजन
निऑन
क्रिप्टॉन
केंद्रकीय विखंडणासाठी कोणते समस्थानिक वापरतात?
कोबाल्ट - 60
आयोडीन - 131
युरेनियम - 235
सोडीयम -24
गॉयटर व थायरॉईड रोगावरील उपचारासाठी कोणते समस्थानिक वापरतात?
कोबाल्ट - 60
आयोडीन - 131
युरेनियम - 235
सोडीयम -24
जमिनीखालील नळांमधील चिरा शोधण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात?
कोबाल्ट - 60
आयोडीन - 131
युरेनियम - 235
सोडीयम -24
कॅन्सर आजारावरील उपचारासाठी कोणते समस्थानिक वापरतात?
कोबाल्ट - 60
आयोडीन - 131
युरेनियम - 235
सोडीयम -24
जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात?
कोबाल्ट - 60
आयोडीन - 131
कार्बन - 14
सोडीयम -24
न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी अणुभट्टीमध्ये कशाचा वापर करतात?
ग्रॅफाईट
जडपाणी
ग्रॅफाईट किंवा जड पाणी
यांपैकी नाही
अणूभट्टीमध्ये न्यूट्रॉन्स ची संख्या कमी करण्यासाठी कोणत्या कांड्यांचा वापर करत नाहीत?
बोरॉन कांड्या
कॅडमियम कांड्या
बोरिलियम कांड्या
बेरियम कांड्या
भारतामध्ये आठ ठिकाणी अणूवीज निर्मिती केंद्रात एकूण किती अणूभट्या कार्यान्वित आहेत?
20
21
22
24
4 ऑगस्ट 1956 रोजी मुंबई भाभा अणूसंशोधन केंद्र येथे भारतातील कोणती पहिली अणुभट्टी निर्माण केली गेली?
कल्पना
सुनिता
अप्सरा
मंदाकिनी
भारतामध्ये कोणत्या अणू ऊर्जा उत्सर्जित करणाऱ्या मूलद्रव्याचे मोठे साठे आढळतात?
युरेनियम - 235
थोरीयम - 232
थोरीयम - 233
युरेनियम - 233
