Worksheetsग्रंथ वाचन क्रमांक-५
Total questions: 20
Worksheet time: 10mins
१. बुध्दाच्या निर्वाणानंतर लवकरच पहिली ' बुद्धसंगीती ' भरविली गेली या संगीतीच्या अध्यक्षस्थानी कोण होते?
आनंद
उपाली
काश्यप
कपिलवस्तूचे रहिवासी
२. बुध्दाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही. "तो म्हणे, मी '....................' आहे , '....................' नव्हे."
प्रेषित, देवदूत
मार्गदाता, मोक्षदाता
देवदूत, साक्षात्कारी
मोक्षदाता, मार्गदाता
३. भगवान बुध्दांच्या शिकवणुकीप्रमाणे 'मोक्ष' म्हणजे काय?
देवापर्यंत पोहचने
निर्वाण
देव बनने
पूर्णजन्म
४. भगवान बुध्दांचा धम्म समजण्यासाठी किती वर्गांची ओळख करून घेतली पाहिजे?
चार
तीन
पाच
आठ
५. खालील विधान चूक की बरोबर ते सांगा.
" भगवान बुध्दांने आपल्या धम्मात स्वत: साठी विशेष स्थान राखलेले नाही."
चूक
बरोबर
६. खालील पैकी कोण स्वत:ला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानीत असे?
कृष्णा
महंमद पैगंबर
मोझेसन
ख्रिस्त
७. " जो काया , वाचा ,मन शुध्द पवित्र आहे,जो निष्पाप ,स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे,त्याला लोक काय म्हणतात.
निष्कलंक
उध्दट
कलंकित
तंद्री
८. मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यांपासून दूर राहतो. त्याला कोणती शुचिता म्हणतात.
कायेची शुचिता
वाक् शुचिता
मन: शुचिता
देह शुचिता
९. किती प्रकारच्या दुर्बलता साधनेला बांधक ठरतात?
आठ
पाच
सात
बारा
१०. घात ( अपयश ) किती प्रकारचे आहेत?
तीन
पाच
आठ
सात
११. गयेत राहात असताना बुध्दाने भिक्खूंना जे प्रवचन दिले,त्याचा मुख्य विषय कोणता होता?
राग
द्वेष
राग आणि द्वेष दोन्ही
राग आणि द्वेष दोन्ही नाही
१२. भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांतांचा ................ हा केन्द्रवर्ती सिध्दान्त आहे.
निर्वाण
निब्बाण
मोक्ष
परिनिब्बाण
१३. कोणत्या सूक्तांत भगवान बुध्दांनी आनंदाला लोभ- संयमनाची महती सांगितली आहे?
परित्रान सूक्त
अंगुलीमाल सूक्त
अग्निस्कंधोपम सूक्त
महानिदान सूक्त
१४. सजीव प्राण्याचे शरीर किती महाभूतांचा परिणाम होय; असे भगवंतांनी सांगितले?
चार
पाच
तीन
दोन
१५. " दिट्ठ धम्म वेदनीय कम्म " म्हणजे काय?
तात्काळ फल देणारे कम्म
ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो ते कम्म
अनिश्चित काळाने फळ देणारे कम्म
त्याचा काहीच परिणाम होत नाही ते कम्म
१६. दैवी चमत्कृतीवर वीश्वास ठेवणे म्हणजे............
चमत्कार
धम्म
सदधम्म
अधम्म
१७. वासेट्ठ आणि भारद्वाज हे दोघे कोणत्या गावात राहत असत?
साकेत
नालंदा
मनसाकद्
कपिलवास्तू
१८ . प्रमाणाचे कोणते दोन प्रकार भगवान बुध्दांनी सांगितले आहे?
प्रत्यक्ष आणि अनुमान
क्रिया आणि प्रतिक्रिया
उत्तर आणि प्रतिक्रिया
अनुमान आणि अंदाज
१९. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणार्या सिध्दान्ताविरुध्द भगवान बुद्धाने आपला कोणता सिध्दान्त मांडला?
चेतना सिध्दान्त
नामरूप सिध्दान्त
चित सिध्दान्त
संमिश्रित सिध्दान्त
२०. सुखकर किंवा दु:खकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते,तेव्हा त्याला कोणते विज्ञान म्हणतात.
ज्ञानमूलक विज्ञान
क्रियाशील विज्ञान
भावनामूलक विज्ञान
तर्कविसंगत विज्ञान
